फलटणमध्ये ‘घडयाळ’ विरुद्ध ‘तुतारी’मध्येचं लढत; अजित पवार गटाकडून सचिन पाटलांना उमेदवारी जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांत जागावाटपाचं गुऱ्हाळ चालू आहे. या दोन्ही आघाड्यांत जागावाटपाचा नेमका फॉर्म्यूला अद्याप समोर आलेला नाही. ज्या-ज्या जागांवर तोडगा निघालेला आहे, त्या-त्या जागांवर वेगवेगळे पक्ष आपले उमेदवार जाहीर करत आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या पक्षाने नुकतेच आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण चार मतदारसंघांसाठी अजित पवार यांनी आपले उमेदवार दिले आहेत. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातील वाईनंतर फलटण विधानसभा मतदार संघ हा अजितदादा गटाकडे आला असून या मतदार संघातून सचिन पाटील यांना उमेद्वारी देण्यात आली आहे. त्यामुळे शरद पवार गटाचे दीपक चव्हाण (Deepak Chavan) विरुद्ध अजित पवार गटाचे सचिन पाटील कांबळे (Sachin Patil Kamble) अशी लढत होणार आहे.

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शेतकरी बागायतदार कुटुंबातील सचिन कांबळे पाटील यांची उमेदवारी मोठ्या जल्लोषात जाहीर केली आहे. गेली दोन वर्षे त्यांचे फलटण कोरेगावमध्ये दौरे सुरू केले. भाजपचे विधानसभा प्रमुख म्हणून त्यांनी तालुका पिंजून काढला आहे. मात्र, ऐनवेळी आता जागा वाटपात फलटण विधानसभा मतदार संघ हा अजितदादा पवार गटाकडे गेला आहे. त्यामुळे या मतदार संघातून अजित पवार गटाकडून जाहीर झालेल्या उमेदवार यादीत सचिन पाटील कांबळे यांचे नाव आहे.

फलटणमध्ये आता खरी लढत ‘घड्याळ’ विरुद्ध ‘तुतारी’मध्ये

फलटण विधानसभा मतदार संघात नुकताच राजकीय भूकंप झाला आहे. या ठिकाणी अजित पवार यांनी जाहीर केलेल्या ज्यांना उमेदवारी दीपक चव्हाण यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हातात घेतली आहे. तसेच येथील मतदार संघातील जिल्हाध्यक्षासह पदाधिकाऱ्यांनीही पक्षांतर केले आहे. या मतदार संघात या ठिकाणी दीपक चव्हाण विरुद्ध अजित पवार गटाच्या सचिन कांबळे पाटील अशी लढत होईल.

दीपक चव्हाण यांच्यासमोर पाटलांचे आव्हान?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी फलटण विधानसभा मतदारसंघातून दीपक चव्हाण यांना फोनवरुन उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, जाहीर केलेला उमेदवारच पक्ष सोडून गेल्याने या ठिकाणी उमेदवारच उरलेला नाही. त्यामुळे अजितदादा ऐनवेळी कुणाला उमेदवारी देणार कि हा मतदार संघ भाजपला सोडतील अशी चर्चा होती. मात्र, भाजपने जागा वाटपात अखेर हा मतदार संघ अजित पवार गटाकडे सोडला आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या दोन दिवस अगोदर अजित पवार गटातून अचैन पाटील यांना उमेदवारी जाहीर कारण्यात आली आहे.

२५५ फलटण विधानसभा

एकूण मतदार – ३३८४६४
पुरुष मतदार – १७२४५९
स्त्री मतदार – १६५९९१
इतर मतदार – १४ २०१९

विधानसभा निकाल उमेदवार – मिळालेली – टक्केवारी

दीपक चव्हाण (राष्ट्रवादी) ११७६१७ – ५४.५५%
दिगंबर आगवणे (भाजप) ८६६३६ – ४०.१८%
अरविंद आढाव – (वंबआ ५४६०) – २.५३%