फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधून सचिन पाटलांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघांमधून सचिन सुधाकर पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. फलटण येथे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार दीपक चव्हाण आणि सचिन पाटील कांबळे यांच्यात लढत होणार आहे.

फलटण विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत ही उद्या मंगळवार पर्यंत आहे. दरम्यान मुदत संपण्याच्या आदल्या दिवशी आज पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राज्यसभा खासदार नितीनकाका पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, नवनिर्वाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील, जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, फलटण तालुका शिवसेनाप्रमुख नानासाहेब इवरे यांच्यासह मान्यवरांचे उपस्थिती होती.

महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून सचिन सुधाकर पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फलटण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून रॅली काढत शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते. यावेळी धनगरी परंपरेचे देखावा देणारे गजी नृत्य सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आले होते. यासोबतच भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित रॅलीला उस्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे.