‘रयत क्रांति’च्या आंदोलनाची दखल; बोंबाळवाडी तलावात पाणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील बोबाळवाडी तलावामध्ये पाणी शिल्लक नसल्याने शामगाव परिसरातील शेतकऱ्यांची पिके वाळत चालली होती. चार दिवसांपूर्वी रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे यांच्या नेतृत्वाखाली शामगाव मधील शेतकऱ्यांनी टेंभू उपसा प्रकल्प अभियंता राजन रेड्डीयार व अभियंता दादा नरवडे यांना निवेदन देत पाणी सोडण्याचा इशारा दिला. त्यानंतर टेंभू प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी तलावामध्ये पाणी सोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या सोडलेल्या पाण्याचे सचिन नलवडे यांच्यासह शेतकऱ्यांनी नुकतेच पूजन केले.

बोंबळवाडी येथील तलावामध्ये सुरू झालेल्या पाण्याची पाहणी शामगाव येथील शेतकर्यांसह सचिन नलवडे यांनी नुकतीच केली. यावेळी तलावामध्ये येणाऱ्या पाण्यामध्ये श्रीफळ सोडून नलवडे यांच्या हस्ते पाण्याचे पूजन करण्यात आले. टेंभू विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन त्वरित पाणी सोडल्याबद्दल सचिन नलावडे यांनी टेंभू प्रशासनाचे आभार मानले तसेच तलावा पूर्ण भरून देण्याची तसेच मार्च व मेमध्ये अजुन दोन आवर्तन सोडण्याचीही मागणी केली.

टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी चाळीस ते पन्नास टक्के धरण भरण्यासाठी आठ ते दहा दिवस पाणी सुरू ठेवणार असल्याचे सांगितले तसेच शेतकऱ्यांनी पाणी वापरायचे फॉर्म भरून देण्याचे आव्हान केले आहे. धरणामध्ये पाणीसाठा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज देणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे
यावेळी शामगाव येथील शेतकऱ्यांनी सचिन नलवडे व टेंभू प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी रयत क्रांति संघटनेचे जिल्ह्यध्यक्ष शिवाजी पाटील, शामगाव येथील बापूराव पोळ, बाबा पोळ, युवराज पोळ, चंद्रकात डांगे संतोष जाधव तत्यासो पोळ योगेश पोळ व शेतकरी उपस्थित होते