कराड प्रतिनिधी । सध्या पावसामुळे शाळेतील मुलांना शाळेत जाण्यास उशीर होत असल्याने त्यांच्या पालकांनी त्यांच्यासाठी स्कुल बसेस लावल्या आहरेत. या स्कुल बसमधून विद्यार्थी शाळेत ये-जा करत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कुल बसेसमध्ये सर्व आपत्कालीन साधने आहेत का? त्यांच्या चालकांकडून किती वेगाने स्कुल बसेस चालवली जातात? याची तपासणी साताऱ्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत नुकतीच करण्यात आली. यामध्ये शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या सुमारे ३५ स्कूलबसची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २ स्कूल बसेस जप्त करण्यात आल्या.
सातारा जिल्ह्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायू वेग पथकामार्फत धडक कारवाईची मोहीम राबविली जात आहे. खासगी प्रवासी वाहतूक करणाच्या बसबरोबर स्कूल बसची अचानक तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. आरटीओच्या पथकाकहून सातारा शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी सुमारे ३५ स्कूल बसची तपासणी करण्यात आली. या कारवाईत चालकाकडून वेग मर्यादा उपकरण कार्यान्वीत असल्याचे खातरजमा, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी, आपत्कालीन खिडकी सुस्थितीत आहे का नाही? वाहन फिटनेस, अग्निशमन यंत्रणा अशा दोषी ३५ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
प्रादेशिक परिवहन विभागाकडून शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी काही नियम खालून देण्यात आले आहेत. त्यांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी वाहन चालक व मालकांची आहे. मात्र, काही ठिकाणी या नियमांना तोलाजली वाहिल्याने पहायला मिळत असल्याने परिवहन विभागामार्फत अशा प्रकारची कारवाईची मोहीम राबविली जाते.