सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कास पठाराचे व्यवस्थापनाची पाहणी करणारी कास पठार व्यवस्थापन समिती वन विभाग यांची बैठक संपन्न होऊन यामध्ये आगामी काळात करावयाच्या कामांचे नियोजन करण्यात आले. यासंदर्भाने वन विभाग व कास पठार संयुक्त वन व्यवस्थापन समितीची बैठक घेत वन अधिकाऱ्यांकडून कास, भांबवली येथील काही बदलाच्या अनुषंगाने महत्वाच्या सूचनाही करण्यात आल्या.
सताऱ्यातील कास येथे paar पडलेल्या आढावा बैठकीस सातारा वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण, कास समितीचे अध्यक्ष दत्ता किर्दत, उपाध्यक्ष प्रदीप कदम, सदस्य रामचंद्र उंबरकर, विजय वेंदे, ज्ञानेश्वर आखाडे, संतोष काळे, पुष्पा चिकणे, कांचन किर्दत आदी उपस्थित होते.
कासबरोबरच इको टुरिझम बोर्डाने मंजूर केलेल्या भांबवलीच्या निसर्ग पर्यटनाच्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी कास व भांबवली वजराई पर्यटन विकासकामांबाबतचा आढावा घेण्यात आला. कास पठार येथे टेम्पररी नेचर इंटरप्रिटेशन सेंटर गेट क्रमांक १ येथे वापरात आहे, तसेच सद्यःस्थितीत एक गोल्फ कार्ड उपलब्ध आहे. त्याचबरोबर पठारावर आढळणाऱ्या जैवविविधतेची शिल्प आणि चित्र पठारावर जागोजागी उभारण्यात आलेले आहेत.