वाई विधानसभा मतदारसंघात शासकीय यंत्रणा कामाला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | आगामी २०२४ च्या सातारा लोकसभेच्या निवडणुकीला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी वाई विधानसभा मतदार संघातील वाई, खंडाळा, महाबळेश्वर या तीनही तालुक्यांच्या अधिकाऱ्यांची प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी महत्वपूर्ण बैठक घेतली.

या बैठकीस तीनही तालुक्यांचे तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी, नायब तहसीलदार, सर्व शासकीय कार्यालयातील नेमलेले झोनल ऑफिसर व क्षेत्रीय अधिकारी, क्षेत्रीय पोलिस अधिकारी, पोलिस निरिक्षक, सहाय्यक पोलिस निरिक्षक, पोलिस कर्मचारी असे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सोमवारी १२ फेब्रुवारी रोजी वाई पंचायत समितीच्या किसनवीर सभागृहात वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी एक दिवसीय प्रशिक्षण दिले.

प्रांताधिकारी राजेंद्र जाधव म्हणाले, सन २०२४ च्या सातारा लोकसभेच्या निवडणुकीची तारीख कुठल्याही क्षणी निवडणूक आयोग जाहीर करण्याची शक्यता आहे. या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी वाई, खंडाळा, महाबळेश्वर या विधानसभा मतदारसंघातील तीनही तालुक्यातील निवडणुकीसाठी लागणारी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज व सक्षम असली पाहिजे यासाठी ही तयारी करण्यात आली आहे.