कराड प्रतिनिधी | कराड महसुल विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी व प्रांताधिकारी म्हेत्रे यांच्या आदेशनुसार शुक्रवारी अचानक कारवाई केली. या कारवाईत आवश्यक परवाने नसलेले कराड तालुक्यातील सैदापूर मंडलातील ११, शेणोली मंडलातील ८, कवठे मंडलातील १, येळगाव मंडलातील १ आणि इंदोली मंडलातील १ असे एकुण २२ अनधिकृत क्रशर सुरु असल्याचे दिसुन आले. संबंधितांचे क्रेशर शुक्रवारी सील कण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील महसूल विभागाच्या नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अतिरीक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, येथील प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांना अनधिकृत क्रेशरवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानंतर शुक्रवारी ही धडक कारवाई करण्यात आली.
कराडचे तहसिलदार पवार यांच्या समवेत मंडल अधिकारी पी. डी. पाटील, प्रविण शिंदे, श्रीकांत धनावडे, श्रीमती शितल सुतार, लालासाहेब साळुंखे यांच्यासह तलाठी अमोल महापूरे, शेखर भोसले, श्रीमती शमशाद शेख, एकनाथ कुंभार, विदया मुल्लेमवार यांनी अचानक तपासणी मोहिम राबवली.