कराडात ‘हॅलो कृषी’च्या शेतकरी ते थेट ग्राहक हापूस आंबा विक्री ऑटलेटला उदंड प्रतिसाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सध्या मे चा महिना सुरू झाल्याने बाजारात फळांचा राजा देवगडचा हापूस आंब्याची विक्री जोरात सुरू आहे. बाजारात हापूस आंब्याची आवक वाढली असून हॅलो कृषी आउटलेटच्या शेतकरी ते थेट ग्राहक या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आपण बाजारात हापूस आंब्याला अधिक खरेदीसाठी पसंती देतो. कारण या आंब्याची चवच लई भारी असते. मात्र, हापूस आंबा म्हणून अनेकदा बाजारात ग्राहकांना कर्नाटकी आंबा दिला जातो. हुबेहूब देवगड हापूसप्रमाणे दिसणाऱ्या कर्नाटकी आंब्याचा दर कमी असल्याने नागरिकही हापूस समजून तो घरी घेऊन जातात. मात्र, नंतर त्याची चव घेतल्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचे समजते.

आंब्यात कीड लागणे, गोडीला कमी असणे, चव बरोबर नसणे यामुळे आपली फसवणूक झाल्याची भावना यामुळे होते. आता याला आळा बसणार असून हॅलो कृषी आउटलेटच्या माध्यमातून शेतकरी ते थेट ग्राहक या उपक्रमाअंतर्गत अस्सल कोकणातला आंबा नागरिकांना उपलब्ध करण्यात आला आहे.

हापूस आंब्याचे शेतकरी ते थेट ग्राहक हे हॅलो कृषी आउटलेट आहे तरी कुठे?

हॅलो कृषी हे महाराष्ट्रातील २ लाखहून अधिक शेतकऱ्यांसोबत काम करत आहे. ‘हॅलो कृषी’ च्या देवगड तालुक्यातील शेतकऱ्यांचे हापूस आंबे कराड येथील आउटलेटला विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले असून थेट शेतकऱ्याच्या बागेतून आंबे येत असल्याने ओरिजिनल हापूस आंबे अगदी योग्य दरात येथे उपलब्ध करण्यात आले आहेत. कराड शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालयाच्या (कॉटेज हॉस्पिटल) च्याबरोबर समोर सारस्वत बँकेच्या शेजारी, साई नॉव्हेल्टीज ड्रेसच्या बाजूला हॅलो कृषी आउटलेट असून सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत ग्राहकांसाठी खुले आहे.

mango 3

कराडसह मलकापूरच्या नागरिकांचा उदंड प्रतिसाद

कराड येथील हॅलो कृषी आउटलेटवर खात्रीशीर आणि ओरिजिनल हापूस आंबे मिळत असल्याने नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. शिवाय ग्रेड नुसार आंबे मिळत असल्याने संपूर्ण पारदर्शक व्यवहार असून या ठिकाणी येणाऱ्या एकाही ग्राहकाची फसवणूक होत नाही, असा विश्वास यामुळे येतो आहे. थेट देवगडच्या शेतकऱ्यांकडून हापूस आंबा कराड येथील हॅलो कृषीच्या देवगड हापूस आंब्याच्या ऑटलेटवर उपलब्ध होत असल्याने येथे भेटी देणारे अनेक नागरिक ५-६ डझनाची पेटी खरेदी करत आहे. त्यामुळे हॅलो कृषीच्या शेतकऱ्यांनाही फायदा होतो आहे.

Mango 1 1

संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबे; चवही लागते न्यारी

बाजारात मिळणारे आंबे हे अनेकवेळा केमिकल, पाउडरच्या मदतीने पिकवलेले असतात. त्यामुळे ते आरोग्याला हानिकारक तर असतातच शिवाय त्याची चवही थोडी वेगळी लागते. जे आंब्यामधील शौकीन आहेत ते लोक नेहमी अडीत नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबेच घेतात. नैसर्गिक ऑरगॅनिक पद्धतीने पिकवलेले आंबे लवकर खराब होत नाहीत तसेच सुरकुत्या पडल्या तरी आतमध्ये व्यवस्थित असतात.