चिठ्ठीद्वारे पार पडले कराड तालुक्यातील ‘या’ 27 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत

0
3

कराड प्रतिनिधी । नुकताच विधानसभा निवडणुकीचा धुरळा बसतो न बसतो आता ग्रापंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कराड तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या प्रवर्गासाठी सरपंच पदासाठीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज कराड च्या मुख्य प्रशासकीय इमारतीत पार पडला. तहसिलदार कल्पना ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली शालेय विद्यार्थिनीच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले.

कराड येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत २७ ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत शांततेत व सुरळीत पार पडली. आरक्षण सोडत कार्यक्रमास निवासी नायब तहसीलदार श्री. बी. के. राठोड, निवडणूक नायब तहसीलदार श्री. हेमंत बेस्के, अव्वल कारकून श्री. युवराज काटे, महसूल सहायक श्री. आनंदराव पोळ उपस्थित होते.

ग्रामपंचायतीचे नाव व जाहीर करणेत आलेले सरपंच आरक्षण

नारायणवाडी – अनुसुचित जाती प्रवर्ग
वनवासमाची (सदाशिवगड) – अनुसुचित जाती प्रवर्ग
बाबरमाची – अनुसुचित जाती प्रवर्ग
शिंगणवाडी – अनुसुचित जाती महिला प्रवर्ग
वाण्याचीवाडी – अनुसुचित जाती महिला प्रवर्ग
मेरवेवाडी – अनुसुचित जाती महिला प्रवर्ग
संजयनगर (काले) – नागरिकांचा मागास प्रवर्ग
कोरीवळे – नागरिकांचा मागास प्रवर्ग
कोळेवाडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग
कालेटेक – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
लोहारवाडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
तुळसण – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
कापील – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
जुजारवाडी – सर्वसाधारण खुला
विठोबाचीवाडी – सर्वसाधारण खुला
वडोली भिकेश्वर – सर्वसाधारण खुला
कचरेवाडी – सर्वसाधारण खुला
कोर्टी – सर्वसाधारण खुला
पाचुपतेवाडी – सर्वसाधारण खुला
धनकवडी – सर्वसाधारण खुला
मुनावळे – सर्वसाधारण महिला
नडशी – सर्वसाधारण महिला
मसुर – सर्वसाधारण महिला
पवारवाडी (नांदगाव) – सर्वसाधारण महिला
राजमाची – सर्वसाधारण महिला
माळवाडी – सर्वसाधारण महिला
यादववाडी – सर्वसाधारण महिला