फलटणच्या RTO कार्यालयाच्या इमारतीच्या डागडुजीचे काम सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | फलटण येथे स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. तसेच फलटण आरटीओसाठी MH – 53 नंबर देखील मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, काल बुधवारी परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फलटण येथे आरटीओ ऑफिसच्या जागेची पाहणी केली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी या कार्यालयास सुरुवात होईल ? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

आगामी काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. या आचारसंहितेपूर्वी कार्यालय सुरु झाल्यास नागरिकांनी आवाहन परवान्यासह इतर कामे पूर्ण होण्यास मदत होईल. यावेळी फलटण – शिंगणापूर रोड वरील जुने लेडीज हॉस्टेलची जागा अंतिम करण्यात आली आहे. सदरील इमारतीचे डागडुजी, परिसर स्वच्छता व फर्निचर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण तालुक्यातील जनतेला वाहन पासिंगसाठी व आरटीओ कार्यालयाच्या कामानिमित्त सातारा येथे जावे लागत होते. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना खर्च व त्रास खूप मोठ्या प्रमाणात होत होता. याची दखल घेऊन भाजप खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील जनतेच्या सोईसाठी नवीन आरटीओ कार्यालय नुकतेच मंजूर करून आणले आहे.