वाहन मालकासह एजंटही अडकले कायद्याच्या कचाट्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | प्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा केलेल्या वाहनांचे जुन्या आरसी बुकवरील मूळ तपशिल काढून आवश्यक असणाऱ्या वाहनांचा तपशिल तयार करून बनावट आरसी तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून १८ वाहन मालकांसह एजंटांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुन्या काळी असलेल्या कागदी आरसी बुकच्या जागी आता डिजिटल प्रिंट केलेले स्मार्ट कार्ड आले आहे. त्याप्रमाणे जुने कागदी आरसी बुक जमा करून घेतल्यानंतर नवीन स्मार्ट कार्ड देण्यात येत आहे. जुन्या आरसी बुक वरील संबंधित वाहनांच्या तपशिलात खाडाखोड करून त्या जागी आवश्यक असलेल्या वाहनांचा तपशील छापून बनावट नोंदणी प्रमाणपत्र (आरसी स्मार्ट कार्ड) तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

वाहनावरील कर्ज तारण कमी करणे, पत्ता बदलणे, वाहन हस्तांतर करण्यासाठी विहीत नमुना क्र. २९, ३० व ३५ मध्ये भरून बनावट नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे करून अधिकारी, कर्मचाऱ्यांची फसवणूक करणारे १९ जण या प्रकरणात अडकले आहेत. सर्व संशयितांविरोधात भा. द. वि. स. क. ४२०, ४६३, ४६४, ४५५, ४६८,४७१,३४ नुसार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल गुजर (सातारा), अमर सतीश देशमुख, रमजान दिलावर मुजावर, श्रीमती शितल संतोष भागवत, किरण रामदास जाधव, रामकृष्ण चांगदेव वाळेकर, ओंकार रामचंद्र पवार, दिनेश शहाजी जाधव, श्रीमती अमृता प्रतिक राजपुरे, सागर उत्तम गायकवाड, श्रीमती वैष्णवी अनिल जाधव, विजय संपत काजळे , ओंकार आनंदा जाधव, प्रविण हरिश्चंद्र सोनमाळे, गंगारान शंकर शेडगे, साहिल सतीश पिसाळ, हरुण दिलावर सय्यद, संपत सिंधु ठोंबरे, वाजिवअली ताजुद्दीन शिकलगार यांनी ही बनावटगिरी केली आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात अनेक एजंट पैशाच्या हव्यासापोटी कागदपत्रात छेडछाड करतात. मूळ तपशिल काढून आवश्यक असणारा टाकून बनावटगिरी करण्यात काहीजण माहिर आहेत. अशा माहीर असणाऱ्यांनी १८ वाहन मालकांना मदत केल्याची चर्चा सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात आहे.