सातारा प्रतिनिधी | राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज औद्योगिक विकास महामंडळाची सात प्रादेशिक कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. या सात प्रादेशिक कार्यालयामध्ये साताऱ्याच्याही समावेश आहे. मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशननेही पाठपुरावा ठेवला होता. अखेर या पाठपुराव्याला यश आले आहे.
यामध्ये सातारा, सोलापूर, बारामती, नगर, जळगाव, अकोला व चंद्रपूरचा समावेश आहे. या कार्यालयांचा आकृतिबंध दहा महिन्यांच्या आत वित्त विभागाकडून मंजूर करून घेतला जाणार आहे, तसेच या कार्यालयांसाठी ९२ पदांची निर्मिती केली जाणार आहे. त्याचा खर्चही औद्योगिक विकास महामंडळाच्या निधीतून भागविण्याची सूचना केली आहे.
विविध पदांमध्ये प्रादेशिक अधिकारी सात, व्यवस्थापक पाच क्षेत्र व्यवस्थापक एक, उपरचनाकर सात, प्रमुख भूमापक सात, सहायक क्षेत्र व्यवस्थापक १४, सहायक १७, लिपिक टंकलेखक १७, वाहनचालक सात, शिपाई १० पदांचा समावेश आहे. साताऱ्यात प्रादेशिक कार्यालय करण्याचा निर्णय झाल्याने येथील उद्योजकांची अनेक दिवसांपासूनच मागणी पूर्ण झाली आहे.