सातारा जिल्हा परिषदेमध्ये ‘डेटा एन्ट्री ऑपरेटर’ पदावर भरती सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषद (Satara ZP Recruitment 2024) अंतर्गत भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून डेटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – जिल्हा परिषद, सातारा
भरले जाणारे पद – डेटा एन्ट्री ऑपरेटर
पद संख्या – 04 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (ZP Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑगस्ट 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सातारा जिल्हा परिषद, सातारा

नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा
वय मर्यादा – 18 ते 35 वर्षे
मिळणारे वेतन – रु. 20,650/-

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

सातारा जिल्हा परिषदेत डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी भरती प्रक्रिया राबविली जात असून त्यासाठी 1) किमान इ. 12 वी पास (पदवीधर 4 उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल), 2) मराठी टंकलेखन 30 शब्द प्र. मि., 3) इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्र.मि., 4) MS-/CIT किंवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण अशी पात्रता ठेवण्यात आलेली आहे.

असा करा अर्ज (Satara ZP Recruitment 2024) –

  1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  2. अर्ज करताना सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.zpsatara.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com