सातारा प्रतिनिधी । सातारा हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला. कारण या मतदार संघात पवार जो उमेदवार देईल तो येथील मतदार हा निवडून देतोच. मात्र, पवारांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि येथील मतांची विभाजनी झाली. अखेर या मतदार संघात अटीतटीच्या झालेल्या लढतीत उदयनराजेंनी सुरुंग लावला. भाजपकडून उमेदवारी घेत शरद पवारांचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा पराभव करून निवडणुकीचा गुलाल उधळला. निवडणूक झाली मतदानाचा निकाल लागला असला तरी शशिकांत शिंदे यांचा पराभव नक्की कोणकोणत्या कारणांनी झाला? कुठून शिंदेंना मताचे लीड कमी मिळत गेला? यासह शिंदेंच्या पराभवाची करणे आपण पाहुयात…
सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे व महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासह एकूण 16 उमेदवार निवडणुकीत उभे होते. सातारा लोकसभेच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत सकाळी मतमोजणीस सुरुवात झाल्यापासून शिंदे यांनी विजयाची आघाडी घेतली होती. त्यामुळे उदयनराजे समर्थकांत प्रचंड नाराजी पसरली होती. फेऱ्यानिहाय मताधिक्य वाढत गेले आणि नवव्या फेरीअखेर शशिकांत शिंदेनी १९ हजारांचे मताधिक्य घेतले होते. पण, त्यानंतर बाजी पलटली.
सातारा लोकसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला असला तरी त्याचा पराभव हा महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी केला असल्याची चर्चा आहे. मात्र, शिंदेंचा खरा पराभव हा उदयनराजेंपेक्षा त्यांच्याच मतदार संघात असलेल्या सामाजिक कार्यकर्ते संजय कोंडीबा गाडे यांनी केला आहे. कारण शिंदेंची मते त्यांना मिळाल्याने शिंदेंना त्यांच्याच विधानसभा मतदारसंघात कमी मते पडली.
‘या’ मतदार संघात ठिकाणी तुटतले लीड
सातारा लोकसभा मतदार संघात सातारा, वाई आणि कराड उत्तर मतदारसंघाच्या मोजणीत उदयनराजेंनी शशिकांत शिंदेंचे लीड तोडून मताधिक्य घेतले. या ठिकाणी शिंदेंना जास्त मते घेता आदी नाहीत. साताऱ्यात स्थानिक पातळीवर उदेनरजे भोसले यांची ताकद जास्त असल्याने त्यांच्या बाजूने स्थानिक जनतेने कौल दिला. तर वाईमध्ये अजित पवार गटाचे नेते मकरंद पाटील यांनी मित्रपक्ष भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विजयासाठी प्रयत्न केले आणि शिंदेच्या विरोधात भूमिका घेतली. तर कराड उत्तरेत भाजपने ताकद वाढवली असल्याने येथून उदयनराजे भोसले यांना लीड मिळाले.
तिसऱ्या क्रमांकाचा उमेदवाराने खाल्ली मते
अत्यंत अतितटीच्या झालेल्या या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना 5 लाख 53 हजार 362 मते तर शशिकांत शिंदेंना 5 लाख 18 हजार 306 मते मिळाली. त्यांच्या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर राहीले ते संजय कोंडीबा गाडे होय. त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळालेली असून त्यांना 35 हजार 311 इतकी मते मिळालेली आहेत. मते कमी पडण्याचे कारण म्हणजे त्यांच्या विधानसभा मतदारसंघात जावळी तालुक्यातील कुसुंबी येथील संजय कोंडीबा गाडे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळालेली असून त्यांना 31 हजार 609 इतकी मते मिळाली. जावळी तालुक्यातील कुसुंबी येथील सामाजिक कार्यकर्ते म्हणून संजय कोंडीबा गाडे यांचे वय 53 असून केवळ 12 वी पास आहेत. जावळी तालुक्यातील असल्याने त्यांनी स्थानिक पातळीवर केलेल्या कामांमुळे त्यांनी शशिकांत शिंदे यांची मते घेतली. त्यामुळे शिंदे यांना जावळीत कमी मते पडली.
तुतारीसारख्या दिसणाऱ्या चिन्हाने शशिकांत शिंदेचा केला घात
सातारामध्ये संजय कोंडीबा गाडे यांच्या ट्रम्पेट या तुतारी सारख्या चिन्हाने ३५ हजार ३११ मते घेतली. त्यामुळे निकाल बदलला. कराड दक्षिण आणि उत्तर मतदारसंघाने उदयनराजे भोसले यांना भरभरून मतदान केले. मात्र जर संजय कोंडीबा गाडे यांचे चिन्ह जर वेगळे असते निकाल काही वेगळी असता अशी चर्चा सुरू झाली आहे.
अखेर गादीलाच मिळाला मान
राज्यसभेचा कार्यकाळ शिल्लक असतानाही खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपने उमेदवारी दिली. दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाने विधान परिषदेचे आमदार आमदार शशिकांत शिंदे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविले. दोन्ही बाजूने जोरदार प्रचार करण्यात आला. सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण ६३.१६ टक्के मतदान झाले. मतदानोत्तर चाचणीत शशिकांत शिंदे यांच्याकडे जनतेचा कल होता. मतमोजणीकडे सगळ्या महाराष्ट्राच्या लक्ष लागलेले होते. मान गादीला देऊन जनता मत राष्ट्रवादीला देणार, असा प्रचार करण्यात आला. मात्र, अखेर गादीलाच जनतेने कौल देत उदयनराजे भोसले यांना विजयी केले.
राष्ट्रवादीच्या फुटीचा झाला परिणाम
शरद पवार यांनी सातारा हा आपला बालेकिल्ला आजपर्यंत शाबूत ठेवला होता.मात्र, पुतण्या अजित पवार यांनी त्यांची साथ सोडली. आणि जिल्ह्यात राष्ट्रवादीत फूट पडली. जिल्ह्यात राष्ट्रवादीकडे असणाऱ्या मतांचे विभाजन झाले. जिल्ह्यात काका शरद पवार यांचा गट तर दुसरा पुतण्या अजित पवार यांचा गट असे दोन गट पडले. आणि याचाच फायदा भाजपने घेतला. भाजपमधून उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी घेत जिल्ह्यात विजय मिळवला.
शरद पवारांची निवड चुकली
सातारा जिल्ह्यात यापूर्वी २०१९ च्या निवडणुकीत शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली. त्यांना पोट निवडणुकीत उतरवून उदयनराजे भोसले यांना पराभूत केले. मात्र, यावेळेस श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतिचे कारण सांगत निवडणूक न लढवणार असल्याचे सांगितले. आणि पवारांपुढे सातारचा उमेदवार निवडीचे संकट उभे राहिले. ऐनवेळी पवारांनी शिंदेंना उमेदवारी दिली. आणि शिंदेनी प्रचार केला. मात्र, उदयनराजेंच्यापुढे शिंदेचा काही निभाव लागला नाही. आणि पवारांची निवड चुकल्याचे दिसून आले.
सातारा लोकसभेतील विधानसभातील आमदारांची भूमिका काय?
कोरेगाव : महेश शिंदे, शिवसेना, पाठिंबा : उदयनराजे भोसले कराड उत्तर : बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, पाठिंबा : शशिकांत शिंदे
कराड दक्षिण : पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस, पाठिंबा : शशिकांत शिंदे
पाटण : शंभूराज देसाई, शिवसेना, पाठिंबा : उदयनराजे भोसले
सातारा : शिवेंद्रराजे भोसले, भाजप, पाठिंबा : उदयनराजे भोसले
वाई : मकरंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस, पाठिंबा : उदयनराजे भोसले