कराड प्रतिनिधी | पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ऊसासारखी पिके वाळून निघाली आहेत. अधिकाऱ्यांनी वाळलेल्या पिकांचे पंचनामे करावे. जर 8 दिवसात पाऊस नाही पडला तर शिंदे – फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना एकरी 50 हजार नुकसान भरपाई द्यावी तसेच पीक कर्ज देखील माफ करावे, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष अशोक लोहार यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना केली.
रयत क्रांती संघटनेच्या वतीने आज मंगळवारी कराड येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आक्रमक झालेल्या संघटनेतील कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी सोबत वाळलेला ऊस घेतला होता. त्यांनी कराड येथील प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा काढून प्रांताधिकारी, तहसीलदार यांना निवेदन दिले.
यावेळी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना अशोक लोहार म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी वाळून गेली आहेत. त्यांच्या पिकांना पाणी नसल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशा अवस्थेत अशा शेतकऱ्यांकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनी पाण्याअभावी वाळून गेलेल्या ऊसाचे पंचनामे करावे, अशा पीक नुकसान असलेल्या शेतकऱ्याचे राज्य सरकारने पिक कर्ज माफ करावे, ऊस पिक वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज फेडता येणार नाही
8 दिवसात जर पाऊस पडला नाही तर राज्य सरकारने तत्काळ दुष्काळ जाहीर करावा. आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी. कासारशिरंबे, ता.कराड येथे पाण्याची पातळी खाली गेल्याने या भागातील ऊस पीक ८० टक्के सुकून गेले आहे. तसेच खरीपाच्या पेरणीसाठी सोयाबिन बियाणे शेतकऱ्यांना ५० टक्के सवलतीत उपलब्ध करुन देण्यात यावेत. तसेच येत्या ८ दिवसात पाऊस आला नाही तर सरकारने वाळलेल्या ऊसाचे पंचनामे केले आहेत. त्या शेतकऱ्याचे पिक कर्ज माफ करावे, अशी. मागणी रयत क्रांती संघटनेचे नेते अशोक लोहार यांनी केली.