गणेशोत्सवात शिधापत्रिकाधारकांना मिळणार ‘आनंदाचा शिधा’; ‘या’ कालावधीत होणार वितरीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राज्यात दि. ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. लाडक्या बाप्पाच्या भक्तांना राज्य शासनाने १०० रुपयांमध्ये आनंदाचा शिधा संच उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. रेशन दुकानांमधून १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत शिधा वितरीत केले जाणार असून सातारा जिल्ह्यातील साधारणतः 3 लाख 94 हजारहून अधिक रेशनकार्डधारक कुटुंबांना मिळणार आहे.

सणासुदीच्या दिवसात गोरगरीब नागरिकांना महागाईची झळ पोहोचू नये, यासाठी अंत्योदय व प्राधान्य रेशनकार्डधारकांना १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 3 लाख 94 हजार कुटुंबांना याचा लाभ मिळेल. या किटमध्ये एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो सोयाबीन तेल, एक किलो चणाडाळ आदी वस्तू राहणार आहे.

प्रशासनाकडून नियोजन सुरु : वैशाली राजमाने

कालच शासनाकडून गौरी-गणपती सणानिमित्त आनंदाचा शिधा वाटपाबाबत घोषणा करण्यात आली आहे. याचा जीआर लवकरच निघेल आणि आमच्याकडे प्राप्त होईल. यंदाही गौरी-गणपतीला १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा अंत्योदय व प्राधान्य गटातील रेशनकार्डधारकांना मिळेल. १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरदरम्यान ‘आनंदाचा शिधा’ किटचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रशासनाकडून नियोजन सुरु असल्याची प्रतिक्रिया जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.

गणपतीनिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’

1) सणासुदीच्या दिवसात महागाईची झळ गोरगरीब कुटुंबांना पोहोचू नये, यासाठी रेशन दुकानांतून अंत्योदय व प्राधान्य गटातील रेशनकार्डधारकांना १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ मिळेल.
2) रेशन दुकानातून मिळणाऱ्या या किटमध्ये। एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो सोयाबीन तेल, एक किलो चणाडाळ आदी वस्तू राहणार आहेत. याद्वारे गोरगरिबांना दिलासा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

ऑगस्टपासून होणार वितरण

सातारा जिल्ह्यात अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थी रेशनकार्डधारक संख्येनुसार जिल्हा पुरवठा विभागाद्वारा मागणी नोंदविण्यात येत आहे. या किटचा गोदामात पुरवठा झाल्यानंतर १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरदरम्यान संबंधित रेशनकार्डधारकांना वितरित करण्यात येणार आहे.

काय काय मिळणार?

रेशन दुकानातून मिळणाऱ्या या किटमध्ये एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो सोयाबीन तेल, एक किलो चणाडाळ आदी वस्तू राहणार आहेत.