सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हयातील रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आहे. सरकारने देशातील गरजू आणि गरीब नागरिकांसाठी स्वस्त धान्य देखील देण्याची योजना चालू केलेली आहे. या स्वस्त धान्य दुकानातून सरकारमार्फत नागरिकांना साखर, तेल, तांदळ तसेच गव्हाचे देखील वाटप करण्यात येते. आता या धान्य वाटप संदर्भात काही नियम बदललेले आहे. हे नियम 1 नोव्हेंबर पासून बदललेले आहेत.
1 नोव्हेंबर पासून या नियमात बदल केलेला आहे. आता या नवीन बदलानुसार रेशन कार्डधारकांना देण्यात येणारा तांदूळ आणि गव्हाच्या वाटपात बदल करण्यात आलेला आहे. आणि हे दोन्ही धान्य समान देण्यात येणार आहे. मागील वर्षी दिवाळीच्या काळात सरकारने या आनंदाचा शिधा वाटप केला होता. परंतु यावेळी दिवाळीत आचारसंहिता लागल्यामुळे कोणताही निर्णय घेता आलेला नाही.
तांदळाचे वाटप कमी होणार
1 नोव्हेंबर पासूनच रेशन कार्ड धारकांसाठी तांदूळ आणि गव्हाच्या वाटपासाठी नवीन नियम लागू झालेले आहेत. यापूर्वी तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गव्हाचं वाटप होत होतं. परंतु आता राशन कार्डवर दोन किलो ऐवजी अडीच किलो गहू आणि तीन किलो ऐवजी अडीच किलो तांदळाचे वाटप होणार आहे. य
इ केवायसी करणे गरजेचे
केंद्र सरकारने या आधीच रेशन कार्डधारकांना ई केवायसी पूर्ण करण्यास सांगितले होते. याआधीही ईकेवायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 सप्टेंबर होती. परंतु खूप अडथळे आल्यामुळे ई केवायसी करता आले नाही. आणि त्यानंतर 31 ऑक्टोबर ही केवायसी करण्याची शेवटची तारीख दिलेली होती. परंतु अजूनही अनेक लोकांचे ईकेवायसी पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सरकारने ही तारीख वाढवून 31 डिसेंबर पर्यंत ठेवलेली आहे.