कराड प्रतिनिधी | कराड- पाटण मार्गावर सकाळी 6:30 वाजल्यापासून ते 7:30 या वेळेत एसटी बसेस थांबत नसल्याने आक्रमक झालेल्या महाविद्यालय मधील विद्यार्थी – विद्यार्थिनींनी आज सकाळी सुपने येथे एसटी बस रोखून धरत ठिय्या आंदोलन केले. यावेळी सुपने ग्रामपंचायत व विद्यार्थी यांच्याशी दुपारी एसटी अधिकारी यांची बैठक लावण्याचा निर्णय झाल्याने विद्यार्थ्यांनी रास्तारोको आंदोलन मागे घेतले.
कराड आगार व्यवस्थापनाला निवेदन देवून व अधिकाऱ्यांनी आश्वासन देवूनही एसटी बस सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांनी आज रास्तारोको आज शुक्रवारी सकाळी 6.30 वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी एसटी बस थांबत नसल्याने सुमारे दोन तास आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी आक्रमक पावित्रा घेत थेट एसटी बसेस रोखून धरल्याने प्रचंड गोंधळ उडू गेला. यावेळी विद्यार्थी- विद्यार्थीनी यांच्यासह ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजित जाधव, विनोद पाटील, पोलिस पाटील कमलेश कोळी, हिंदू एकता आंदोलनचे तुषार उर्फ गणेश पाटील यांनी विद्यार्थ्याच्या असलेल्या अडचणी, त्यांना होणारा त्रास याबाबत एसटी महामंडळ प्रशासनातील अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत याबाबत माहिती दिली.
यावेळी उपस्थितांनी एसटी आगाराचे वैभव साळुंखे यांच्याशी चर्चा करून तात्पुरत्या स्वरुपात रास्तारोको आंदोलन मागे घेतले. सुपनेसह किरपे, वसंतगड, विजयनगर आदी गावातील विद्यार्थ्यांकडून गेल्या अनेक दिवसापासून सुपने गावासह राज्य मार्गावरील गावच्या ठिकाणी एसटी सकाळी 7 व 9 वाजन्याच्या वेळेत एसटी बसेस थाबवण्याची मागणी केली जात आहे. तसेच सुप्ने या ठिकाणी विद्यार्थ्याची संख्या जास्त असल्याने या ठिकाणी स्वतंत्र एसटी बस मिळावी, अशी मागणी केली जात आहे. याबाबत ग्रामपंचायत आणि विद्यार्थी यांनी निवेदन देऊनही एसटी महामंडळाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने हे आंदोलन पुकारले. तीन- चार दिवसापूर्वी केवळ एकच दिवस एसटी बस आली, मात्र त्यानंतर पुन्हा शासन आपल्या दारी कार्यक्रमांचे कारण सांगून बस बंद केली. अखेर आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी एस्टी बसेस रोखून धरल्या