कराड प्रतिनिधी । महादेव जानकर यांच्या नावावर महाराष्ट्रात, उत्तर प्रदेश, आसाम आणि कर्नाटकात आपले उमेदवार एबी फॉर्मवर निवडून आले आहेत. भाजपवाले मला माढा मतदारसंघातून उभे राहण्यासाठी सांगतय पण माझा डोळा 48 लोकसभा मतदारसंघावर आहे. महादेव जानकरचा फोटो लावून भाजपने अन्याय केला आहे. फोटो लावून जेव्हा भाजपने माझ्यावर अन्याय केला आहे. आमच्या ताटात माती टाकत असाल तर आम्ही तुम्हाला ताट बघू देणार नाही. महादेव जानकर आत्महत्या करेन पण कमळ चिन्हावर लढणार नाही, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी दिला.
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या जनस्वराज्य यात्रेचा माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण येथे काल समारोप झाला. यावेळी महादेव जानकर यांनी भाजपवर निशाणाही साधला. यावेळी जानकर म्हणाले की, माझ्या जन स्वराज्य यात्रेचं सर्वच पक्षांनी माढा मतदारसंघात स्वागत केले आहे. याचा अर्थ माझा कोणीच शत्रू नाही. मी शत्रुत्व का स्वीकारत नाही? कारण मी कोणाशीही येणाऱ्या काळात युती करू शकतो.
मागील वेळी जेव्हा लोकसभा निवडणुक झाली झाली त्यावेळी त्या निवडणुकीत काय झाले? मी बारामतीमधून लोकसभेची निवडणूक लढवावी आणि कमळ चिन्हावर ही निवडणूक लढवावी, अशी इच्छा भाजपने व्यक्त केली होती. मात्र, मी आत्महत्या करेन पण कमळ आणि घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार नाही, असं मी भाजपला सुनावलं होतं, असा गौप्यस्फोटही जानकर यांनी केला.