सातारा प्रतिनिधी | विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) यांनी भाजपचे माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकरांवर (Ranjeetsinh Naik Nimbalkar) नुकतीच टीका केली. तर त्यांच्या टीकेला रणजितसिंह निंबाळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “रामराजे म्हणजे फलटण तालुक्यातील मुंज्या, अशी टीका रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी केली आहे. तसेच खोटी उद्घाटनं केली तर तुमच्या नावाचं गाढव पुढच्या कार्यक्रमात फिरवणार, असा इशाराही रणजितसिंह यांनी दिला आहे.
रणजितसिह नाईक माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रामराजे यांच्यावर टीका केली. रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी टीका करण्यापूर्वी रामराजे नाईक निंबाळकर यांनी देखील रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर टीका केली होती. त्याच्या टीकेला आज रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, यापूर्वी माध्यमांशी बोलताना रामराजे निंबाळकर म्हणाले की, दुसरे बंधू रघुनाथ राजे यांनी तर लोकसभेलाच त्यांची भूमिका जाहीर करून थेट विरोधात जाऊन स्टेजवर जाऊन काम केलेला आहे. या सर्वच गोष्टींचे कारण हे रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांची एकूण वागण्याची पद्धत आणि आमच्या घराबद्दल असलेली असूया आहे. त्यांना स्वतःबद्दल प्रचंड अहंकार आहे. रंजीत से नाईक निंबाळकर यांना माझ्यावर टीका करण्याची सवय आहे आज तर ते माझ्या पत्नीबद्दल बोलले मी तोंड उघडलं तर चालेल का मी तोंड उघडलं तर 16 नाव सांगेन.
रामराजे निंबाळकर नेमकं काय म्हणाले?
रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांची एकूण वागण्याची पद्धत आणि आमच्या घराबद्दल असलेली असूया आहे. त्यांना स्वतःबद्दल प्रचंड अहंकार आहे. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना माझ्यावर टीका करण्याची सवय आहे, आज तर ते माझ्या पत्नीबद्दल बोलले, मी तोंड उघडलं तर चालेल का? मी तोंड उघडलं तर 16 नावं सांगेन, असं रामराजे म्हणालेत.