साताऱ्यात भाजपकडून उदयनराजेंनाच उमेदवारी, ‘या’ खासदाराने केला दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | महायुतीत सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा भाजप आणि राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरत असली तरी महायुतीकडून साताऱ्यात उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यावर एकमत झाले आहे. अशात भाजपचे खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांनी मोठा दावा केला आहे. सातारा लोकसभेसाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित करण्यात आली असल्याचे खा. निंबाळकरांनी म्हंटले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खा. निंबाळकर यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खा. निंबाळकर म्हणाले की, सातारा लोकसभेसाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र महायुतीच्या प्रचाराचा नारळ माढा लोकसभेतील माळशिरस येथे फोडला जाणार आहे. तसेच, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व सहयोगी पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. यानंतर उपमुख्यमंत्री आपले कुलदैवत असणाऱ्या निरा नरसिंहपूर येथे जावून नरसिंहाचं दर्शन घेणार आहेत.

दरम्यान, साताऱ्यात उदयनराजेंचा भव्य सत्कार केला जाणार आहे, असे पोस्टर्स देखील सोशल मीडियावर फिरू लागले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीला बारामती, रायगड, शिरूर, नाशिक आणि परभणी या पाच जागा मिळणार अशी माहिती मिळत आहे.