फलटणमध्ये उद्या संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या पक्षप्रवेशानंतर भाजप माजी खासदार रणजितसिंहांचीही होणार जाहीर सभा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष हे उद्या फलटणमध्ये खासदार शरद पवार यांच्या होणाऱ्या जाहीर मेळाव्याकडे लागले आहे. या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार दीपक चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर (Sanjeevraje Naik Nimbalkar) यांच्यासह कार्यकर्ते हे शरद पवार गटात पक्ष प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश कार्यक्रम उद्या दुपारी ३:३० वाजता कोळकी, फलटण येथे होणार आहे. मात्र, त्यानंतर सायंकाळी भाजपचे माजी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर (Ranjeetsinh Naik Nimbalkar) यांची देखील ६ वाजता गजानन चौकात जाहीर सभा होणार आहे.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या जाहीर सभेस ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे पाटील, भाजपा विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरात व तालुक्यात विविध विकासकामे मंजूर करून आणली असून त्याचे भूमिपूजन समारंभ उद्या होणार आहे.

रामराजे यांची भूमिका उद्याचा स्पष्ट होणार

रामराजे नाईक निंबाळकर यांच्या एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी महायुतीत होणारा अन्याय आणि त्रासाचा दाखला देत तुतारी हाती घेण्याची भूमिका मांडली होती. त्यानंतर वाई येथील अजितदादांच्या जनसन्मान यात्रेत रामराजे सहभागी न झाल्याने ते नाराज असल्याचे उघडघड्पणे दिसून आले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवारांशी चर्चा केली आहे. याबाबत अजित पवारांनीही माहिती दिली. मात्र, उद्या फलटण येथे खासदार शरद पवार येणार असून या मेळाव्यात मोठा पक्ष प्रवेश होणार असल्याचे पवारांनी यापूर्वी सांगितले आहे. त्यामुळे, उद्या रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मनात नेमकं काय आहे? हे समजणार असूमी तेही त्यांची भूमिका स्पष्ट होईल.

शरद पवारांना फलटणमधून फोन

इंदापूरच्या कार्यक्रमाला निघण्यापूर्वीच मला कुठूनतरी फोन आला. म्हणाले 14 तारखेला आमच्याकडे यावेच लागतंय. मी म्हणालो काय कार्यक्रम आहे, ते म्हणाले इंदापूरला जो कार्यक्रम आहे तोच आमच्याकडे आहे. मी म्हटलं कुठं, ते म्हणाले फलटणला… असे म्हणत शरद पवारांनी फलटणमधील रामराजे निंबाळकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षप्रवेश कार्यक्रमाचे संकेतच इंदापुरातील कार्यक्रमातून दिले होते. तसेच, आता, याच्यानंतर फलटण, आणि फलटणनंतर जवळपास 1 महिन्याचे सगळे दिवस बुक झाले आहेत, अशा शब्दात त्यांनी पक्षाकडे येणाऱ्या इच्छुकांची व उमेदवारांची गर्दी वाढत असल्याचे स्पष्ट केले होते.