राहुल गांधींनी वारकरी बनून वारीत सहभागी व्हावे नुसता स्टंट करू नये; माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यातील पाडेगाव येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज आगमन झाले. यावेळी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी देखील उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी भर संसदेत आपल्या हिंदू देवतांचा अपमान केला आहे. अश्या ह्या हिंदू विरोधी नेत्यांना वारीत सहभागी होवून नुसता स्टंट करायचा आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राहुल गांधी हे वारीत सहभागी होत आहेत. राहुल गांधी यांना जर वारीत सहभागी व्हायचे असेल तर त्यांनी वारकरी बनूनच सहभागी होणे गरजेचे आहे; असे मत माजी खासदार निंबाळकर यांनी व्यक्त केले.

सातारा जिल्ह्याच्या सीमेवर फलटण तालुक्यातील पाडेगाव येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत पालकमंत्री ना. शंभूराज देसाई, खासदार धैर्यशील मोहिते – पाटील, आमदार दीपक चव्हाण व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.

माजी खासदार रणजितसिंह म्हणाले की; श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने लाखो वारकरी हे सातारा जिल्ह्यात दाखल झाले आहेत. लाखो वारकरी स्वयंशिस्तीने आळंदी ते पंढरपूर असा प्रवास ऊन, वारा व पावसाची तमा न बाळगता करत असतात. अश्या ह्या लाखो वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे.