कराड प्रतिनिधी । इंदोली ता. कराड येथील कै. रामराव निकम शिक्षण शास्त्र (बी.एड) महाविद्यालयाच्या यशवंत गटाच्या छात्राध्यापकांच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जात आहेत. या छात्राध्यापकांच्या वतीने नुकतीच कराडातील डॉ. द. शि. एरम अपंग सहाय्य्य संस्थेच्या मूकबधिर विद्यालय व वसतिगृहास नुकतीच भेट देण्यात आली.
वसतिगृह व विद्यालयाच्या भेटी प्रसंगी अध्यापक वर्गातील शिक्षकांनी वसतिगृहातील मुलांना व विद्यार्थ्यांना प्रार्थना, परिपाठ, योगा, शाळेचे वातावरण, भौतिक सुविधा, पोषण आहार, शिक्षण, अध्यापन पद्धती, औषधपचार, खेळ, व्यवसाय शिक्षण आदीविषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.द. शि. एरम या विशेष शाळेस कृष्णाकाठ गटातर्फे खाऊ वाटप व भेटवस्तू देऊन कार्यक्रमांची सांगता केली.
यावेळी वसतिगृहात कार्यरत असलेल्या मीना पाटील यांनी 1982 पासून या संस्थेची वाटचाल कशा पद्धतीने चालत आलेली आहे. यामध्ये संस्थेचा आणि सरकारकडून मिळणारी मदत व इतर लोकांकडून असणारा सहभाग आदींविषयी माहिती दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्रा. पाटील यांनी मार्गदर्शन केले.