सातारा प्रतिनिधी | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर दि. 10 सप्टेंबर रोजी सातारा येथून कोल्हापूरकडे मार्गस्थ होणार आहेत. दरम्यान, अजितदादांच्या स्वागतासाठी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे आता ॲक्शन मोडवर आलेले आहेत. त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहामध्ये आज, गुरुवार दि. 07 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सातारा जिल्ह्यात जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर तसेच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजितदादा प्रथमच सातारा जिल्हयात येत आहेत. या त्यांच्या दौऱ्यावेळी ते पक्षाबद्दल, सातारा जिल्ह्यातील जनतेबद्दल नक्की काय बोलणार? याकडे सर्व जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे.
सातारा जिल्हा मोठ्या पवारांच्या पाठीशी…
सातारा जिल्हा हा खासदार शरद पवार यांना मानणारा जिल्हा असून, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मनाला जात आहे. १९९९ पासून हा बालेकिल्ला अबाधित आहे; पण अजित पवार यांच्या बंडानंतर सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. तरी देखील सातारा जिल्हा हा शरद पवारांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे यापूर्वी पवारांच्या दौऱ्यातून दिसले आहे.