सातारा प्रतिनिधी । रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधत आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. “अजितदादांकडे गेलो हे फक्त कार्यकर्त्यांना डोळ्यासमोर ठेवून गेलो. कार्यकर्त्यांच्या डोळ्यासमोर ठेवून पवार साहेबांना दुखावलं गेलं. त्यांच्याकडे जाऊन जर कार्यकर्ता जिवंत राहत नसेल, तर कार्यकर्त्यांना तोंड काय द्यायचे? तुम्ही सत्तेत आहात आणि तुम्ही त्यांना थांबवू शकत नाही. आमच्या कार्यकर्त्यांचे संरक्षण करू शकत नाही, असे असेल तर आम्ही त्या विरोधात उडी घेतलेली आहे. कोणाचे सरकार येईल, काय सरकार येईल याची परवा आम्ही फारशी करत नाही, असे रामराजेंनी म्हंटले.
फलटण येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, अनिकेतराजे नाईक निंबाळकर व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात काल प्रवेश पार पडला. त्यानंतर रंगजेबानी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जो माझ्याशी संघर्ष करतोय तो अस्तित्वातच नाही, त्यामुळे मी त्यांच्याशी कशाला संघर्ष करू, अशा शब्दांत विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता शरसंधान केले आहे.
अजितदादांकडे गेलो हे फक्त कार्यकर्त्यांना डोळ्यासमोर ठेवून गेलो. कार्यकर्त्यांच्या डोळ्यासमोर ठेवून पवार साहेबांना दुखावलं गेलं. त्यांच्याकडे जाऊन जर कार्यकर्ता जिवंत राहत नसेल, तर कार्यकर्त्यांना तोंड काय द्यायचे? तुम्ही सत्तेत आहात आणि तुम्ही त्यांना थांबवू शकत नाही. आमच्या कार्यकर्त्यांचे संरक्षण करू शकत नाही, असे असेल तर आम्ही त्या विरोधात उडी घेतलेली आहे. कोणाचे सरकार येईल, काय सरकार येईल याची परवा आम्ही फारशी करत नाही’