लोकसभा निवडणुकीत उमेदवारापेक्षा कोण नको ते पाहू; रामराजे नाईक यांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | महायुतीचं काम करायचं आहे. आताची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. महायुतीत आम्ही आहोत. मतदारसंघाचा उमेदवार ठरला असेल तर माहीत नाही. पण, निवडणुकीत उमेदवार कोण यापेक्षा कोण नको हे माहीत आहे. यादृष्टीने पावले पडणार असल्याचा इशारा
विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खा. शरद पवारांच्या यांच्या विषयी ते म्हणाले की त्यांच्या विषयी आम्हाला विचारू नये, असेही रामराजे म्हणाले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या मुख्य इमारतीत आयोजित पत्रकार परिषदेत रामराजे बोलत होते. यावेळी बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे, युवराज सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत उमेदवारापेक्षा कोण नको ते पाहू; रामराजे नाईक यांचा थेट इशारा

शरद पवार यांच्याबद्दल मला विचारू नका… pic.twitter.com/bOD1NUm6S9— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) September 8, 2023

यावेळी रामराजे म्हणाले की, माण विधानसभा मतदारसंघातही तसेच होईल. माण पाकव्याप्त काश्मिर आहे का ?. ‘१० सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातारा जिल्ह्यात येत आहेत. शिरवळला त्यांचे स्वागत होणार असून कऱ्हाडला महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन ते कोल्हापूरला जाणार आहेत. अजित पवार यांच्या कामाचा झपाटा सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मोहळ त्यांच्याजवळ असते. आताही स्वागताला मोठ्या संख्येने कार्यकर्ते येतील. जिल्ह्यात राष्ट्रवादीची बांधणी सुरू असून आमदार मकरंद पाटील आणि मी लक्ष ठेवून आहे.