साताऱ्यात RPI च्या आठवलेंचे खा. उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत महत्वाचे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । आज साताऱ्यात आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एका कार्यक्रमास हजेरी लावली. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला तर खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीबाबत महत्वाचे विधान केले. राष्ट्रीय काँग्रेसचे अनेक मोठे नेते महायुतीत येत आहेत. पक्ष फुटत चालला आहे. त्यामुळे राहूल गांधी यांनी भारत जोडण्याचे सोडून स्वत:चा पक्ष जोडण्याचे काम करावे. जे लोक पक्ष सोडून चालले आहेत, त्यांना थांबवण्यासाठी थोडा वेळ द्यावा. देशभर फिरून त्यांना फारसा लाभ होणार नाही, असा टोला केंद्रीय मंत्री आठवले यांनी लगावला. तर साताऱ्यात भाजपने उदयनराजे भोसले यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांना पाठिंबा दे, असे मंत्री आठवले यांनी म्हटले.

आज सातारा येथे केंद्रीय मंत्री आठवले यांनी शासकीय विश्रामागृहात पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आरपीआयचे सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, अण्णा वायदंडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री आठवले म्हणाले, महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागावाटपाची चर्चा सुरू आहे. आरपीआयच्या देखील सोलापूर आणि शिर्डी दोन जागांची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राज्यसभेत खासदार असलो तरी लोकसभा लढवावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. २००९ मध्ये शिर्डीतून
माझा पराभव झाला होता. यावेळी शिर्डीतून पुन्हा निवडून यायचे आहे.

वास्तविक शिवसेना-भाजपा युती २७ वर्षे होती. २०१२ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत आरपीआयसोबत आल्यानंतर युतीची महायुती झाली. आता मोठे मित्रपक्ष आल्यानंतर आमचे नाव कुठे येत नाही. आरपीआयचा मतदार इमानदार
असून मी घेतलेल्या भुमिकेला पाठिंबा देणारा आहे. आरपीआय छोटा पक्ष असला तरी गावा-गावात कार्यकर्त्यांची फळी आहे. या कार्यकर्त्यांनाही संधी मिळावी.

…तर RPI उदयनराजेंना पाठिंबा देणार : रामदास आठवले

सातारा लोकसभेची जागा आरपीआयने अजूनही मागितलेली नाही. सातारा लोकसभा भाजपाने लढावी, अशी आमची अपेक्षा असून खा. उदयनराजेंना उमेदवारी मिळाल्यास आरपीआय त्यांच्यासाेबत असेल. इंडिया आघाडी पंतप्रधान पदासाठी २० ते २५ उमेदवार आहेत. प्रत्येक पक्षाचा नेते इच्छुक आहे. नितीश कुमार महायूतीत आले आहेत. ममता बॅनर्जी स्वतंत्र लढणार असल्याचे देखील मंत्री आठवले यांनी सांगितले. .