माता भिमाबाई आंबेडकर यांचे स्मारक उभे करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मोठे करण्यात माता भिमाबाई आंबेडकर यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे सातारा येथील स्मारक भव्य दिव्य होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दिली.

माता भिमाबाई आंबेडकर यांचे सातारा येथील स्मारकाच्या जागेची पाहणी श्री. आठवले यांनी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ते म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यात झाले. माता भिमाबाई यांचे सातारा येथील स्मारक भव्य दिव्य होण्यासाठी शासनाकडून निधी मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचबरोबर स्मारकाला लागणाऱ्या अतिरिक्त जागेबाबत स्थानिक प्रशासनाचेही सहकार्य घेऊ, असेही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्मारकाच्या जागेची पाहणी करताना सांगितले.