जिल्ह्यात ठिकठिकाणी जय श्रीरामच्या घोषात रामनवमी उत्साहात साजरी

0
156
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | प्रतिवर्षाप्रमाणे चैत्रशुद्ध नवमीला मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र यांची जन्म तिथि अर्थात जयंती ‘जय श्रीराम.. जय श्रीराम.. च्या घोषणा देत सातारा जिल्ह्यात रविवारी मोठ्या उत्साहात व विविध धार्मिक कार्यक्रमांनी विविध ठिकाणी रामनवमी साजरी करण्यात आली. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यापासून सुरू असलेल्या नऊ दिवसाच्या श्रीराम नवरात्री उत्सवाची सांगता दिनी रामनवमीला सातारा शहरातील विविध मंदिरात साजरी झाली.

सातारा येथे श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळेत सुरू असलेल्या नऊ दिवसीय श्री राम महा यज्ञाची सांगत आज दुपारी रामनवमीला पूर्णाहूतीने वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर जन्म काळाचे किर्तन सादर करण्यात आले. त्यानंतर पारंपारिक नऊवारी साडीतील महिलांनी पाळण्यात ठेवलेल्या श्रीरामाला जोजवून अंगाई गीते म्हटली सायंकाळी यज्ञस्थळापासून सातारा शहरात भव्य शोभायात्रा काढून रामभक्त आणि आनंद लुटला .

दरम्यान सातारा शहरातील मंगळवार पेठ येथील श्री काळाराम मंदिर प्रतापगंज पेठेतील श्रीगोरा राम मंदिर, शनिवार पेठ येथील श्री शहाराम मंदिर ,समर्थ मंदिर परिसरातील श्री दामले राम मंदिर तसेच शाहूपुरी गेंडामाळ येथील पाटील परिवाराच्या श्री शांत राम अर्थात राम ध्यान मंदिरातही राम जन्मा निमित्त विशेष फुलांची सजावट तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजित आयोजन करण्यात आले होते.

दुपारी बारा वाजता मंदिरांमध्ये गुलाल व पुष्पवृष्टी करून श्रीरामाचा जन्मोत्सव महिलांनी पाळण्यामध्ये श्रीफळ रुपी श्रीरामाला जोजवून पाळणा गीते म्हणून साजरा केला .यावेळी श्री राम जय राम जय जय राम चा जय जयकार करून रामभक्तांनी विशेष आनंद लुटला.