कराड प्रतिनिधी । पिटर्सबर्ग, रशियामध्ये नुकतीच ‘शेअर मार्केट व्यवसाय विकासासाठी आंतरराष्ट्रीय परिषद’ पार पडली. या परिषदेत देशभरातून शेअर मार्केटमधील सल्लागार सहभागी झाले होते. या परिषदेस सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कोळे या गावातील राजेंद्र महादेव चव्हाण यांचा परिषदेत शेअर मार्केटमधील सर्वोत्तम समर्थन आणि सल्लागार उत्कृष्टता पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
कराड तालुक्यातील कोळे या गावातील राजेंद्र चव्हाण यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. गावातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर कराड येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्यांनी शेअर मार्केट या क्षेत्रातीळ अभ्यास कलेला. शेअर मार्केटमध्ये अभ्यासानंतर त्यांनी कराड येथे स्वतःची शेअर मार्केटबाबत प्रशिक्षण देणारे प्रशस्त असे कार्यालय सुरु केले.
राजेंद्र चव्हाण हे कराड तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक युवक- युवतींना शेअर मार्केटबाबत क्लासेसच्या माध्यमातून प्रशिक्षण देत आहेत. शिवाय राजेंद्र चव्हाण हे सातारा जिल्हा बाहेरील युवक व युवतींना देखील शेअर मार्केटबाबत मार्गदर्शन करण्याचे काम करतात. त्यांच्या कार्याची दाखल घेत पिटर्सबर्ग, रशियामध्ये नुकत्याच पार पडलेल्या ‘शेअर मार्केट व्यवसाय विकासासाठी आंतरराष्ट्रीय परिषदमध्ये त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.