सातारा प्रतिनिधी । सातारा, फलटण, कराड, वाई, महाबळेवर या तालुक्यांच्या ठिकाणी सांस्कृतीक कार्यविभाग, सांसकृतीक संचालनालय व सातारा जिल्हा प्रशासन यांच्यावतीने राजधानी महासंसकृतीचे आयोजन करण्यात आले आहे. राजधानी महासंस्कृती महोत्सवाला पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. हे कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य त्याचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. गुरुवार दि. 8 फेब्रुवारी रोजी सातारा येथे सायंकाळी 6 वाजता श्रीमंत छत्रपती शाहू कला मंदिर येथे कलर्स ऑफ इंडिया कार्यक्रम व दि. 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता गांधी मैदान ते शिवतीर्थ शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 8 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत सत्यवती जोशी सभागृह, कन्या शाळा, वाई येथे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन व श्रीमंत छत्रपती शाहू कलामंदिर येथे बचत गट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दि. 8 फेब्रुवारी रोजी फलटण येथे महाराजा मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता शिवव्याख्यान व विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, तसेच याच दिवशी कराड येथील टाऊन हॉल येथे सायंकाळी 5 वाजता जागर लोककलेचा कार्यक्रमाबरोबर विद्यार्थ्यांचे ऐतिहासिक प्रवेश सादरीकरण कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवार दि. 9 फेब्रुवारी रोजी वाई येथील सत्यवती जोशी सभागृह येथे ‘लेणं देशभक्तीचं’ या कार्यक्रमाचे व विद्यार्थ्यांसाठी वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
खेळांचे प्रात्यक्षिक व शिवराज्याभिषेक सोहळा
दि. 10 फेब्रुवारी रोजी पूनम चौक महाबळेश्वर येथे सायंकाळी 5 वाजता फ्लैश मॉब व मैदानी खेळांचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे. रविवारी साताऱ्यात रंगणार जाणता राजा महानाट्यामधील रोमहर्षक शिवराज्याभिषेक सोहळा आणि राजधानी गौरव सोहळा जिल्हा परिषद मैदान, सातारा येथे रविवार 11 फेब्रुवारी रोजी सायं. 6 वाजता भव्यदिव्य राजधानी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
हे कलाकार लावणार उपस्थिती
या सोहळ्यात मृण्मयी देशपांडे, प्राजक्ता गायकवाड, जुईली जोगळेकर, ह्यषीकेश जोशी, भारत गणेशपुरे, रोहित राऊत, रसिका सुनील, रसिका सुनील, सागर कारंडे, नमिता पाटील यांचा सहभाग असणार आहे. त्याचबरोबर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रतिभेतून आणि लेखणीतून साकार झालेल्या महानाट्यामधील रोमहर्षक शिवराज्याभिषेक सोहळा साकारण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.