कराड प्रतिनिधी । भारतीय रेल्वेच्या (Indian Railways) रेल्वे बोर्डाकड़ून रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातून खास करून कराड येथून जाणाऱ्या रेल्वेच्या पॅसेंजर गाड्यांना असलेले दर गुरुवारपासून पासून पूर्ववत करण्यात आले आहेत. त्यामुळे कोल्हापूर मिरज सांगली सातारापर्यंत धावणाऱ्या सर्व पॅसेंजर गाड्यांना पूर्वीचे दर लागू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य गोपाल तिवारी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.
देशभरातून विविध रेल्वे प्रश्न मांडणाऱ्या संघटना, खासदार, लोकप्रतिनिधी यांनी कोवीड काळानंतर रेल्वेने तिकीट दरात करणात आलेली मोठी दरवाढ कमी करण्याची रेल्वे बोर्डाकडे (Railway Board) मागणी केली होती. यास अनुसरून केंद्रीय रेल्वे बोर्डाने गुरुवारी उशिरा सर्व विभागांना दर पुर्ववत करण्याच्या सूचना दिल्या.
त्याची अंमलबजावणी तातडीने आजपासून करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार आजपासून सर्व पॅसेंजर गाड्यांना पूर्ववत दराप्रमाणे तिकिटे उपलब्ध करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कराड ते कोल्हापूर आतापर्यंत असणारे 60 रुपयाच्या ऐवजी आता फक्त 30 रुपयेमध्ये प्रवास करता येईल. याचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य गोपाल तिवारी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना केले आहे.
असे आहेत प्रवासाचे ठिकाण आणि नवे तिकीट दर
1) कराड ते कोल्हापूर – 30 रुपये
2) कराड – हातकणंगले – 25 रुपये
3) कराड – मिरज – 20 रुपये
4) कराड – सांगली – 20 रुपये
5) कराड – किर्लोस्करवाडी – 10 रुपये
6) कराड – भिलवडी – 15 रुपये
7) कराड – ताकारी – 10 रुपये
8) कराड – कोरेगाव – 15 रुपये
9) कराड – रहिमतपूर – 10 रुपये
10) कराड – सातारा – 20 रुपये
11) कराड – वाठार – 25 रुपये
12) कराड – निरा – 30 रुपये
13) कराड – लोणंद – 30 रुपये
14) कराड – जेजूरी – 35 रुपये
15) कराड – पुणे – 45 रुपये