कोणाला ठोकला सलाम तर कोणाशी केलं हस्तांदोलन; राहुल गांधींनी दिली महाबळेश्‍वरास भेट

0
1

सातारा प्रतिनिधी । केंद्र सरकारचे विरोधी पक्षनेते, खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) हे आज सोमवारी सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरला भेट दिली. यावेळी त्यांच्या गाड्यांचा ताफा महाबळेश्वरमधून बाहेर पडत असताना त्यांना भेटण्यासाठी स्थानिक नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. गाडीतून जात असताना राहुल गांधी यांनी काही स्थानिक नागरिकांशी गाडीतूनच संवाद साधला यावेळी त्यांनी काहीना सलाम ठोकला तर काहींशी हस्तांदोलन देखील केले.

महाबळेश्वरमध्ये सध्या गुलाबी थंडी पडली असून, पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी राहुल गांधी यांनी आज महाबळेश्वरमध्ये आले.यावेळी त्यांनी नागरिकांशी देखील संवाद साधला. राहुल गांधी महाबळेश्वर येथील पॉइंट, प्रेक्षणीय वेण्णा लेक याची पाहणी करण्यापूर्वी त्यांनी महाबळेश्वरमधील डॉ. बनाजी यांच्या कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यानंतर ते पुन्हा पुण्याला जात असताना महाबळेश्वरमधील स्थानिक नागरिकांनी त्यांना थांबवून महाबळेश्वरची प्रसिद्ध स्ट्रॉबेरी भेट दिली.

राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने महाबळेश्वरमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राहुल गांधी यांनी महाबळेश्वरमध्ये दोन ते अडीच तास उपस्थित राहत येथील निर्सगरम्य ठिकाणांना देखील त्यांनी भेट दिली. सायंकाळच्या सुमारास महाबळेश्वरमधून ते पुण्याकडे रवाना झाले.