सातारा प्रतिनिधी । केंद्र सरकारचे विरोधी पक्षनेते, खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) हे आज सोमवारी सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरला खासगी दौऱ्यावर येत आहेत. महाबळेश्वरमध्ये सध्या गुलाबी थंडी असून, पर्यटनस्थळांना ते भेट देणार आहेत. यावेळी ते नागरिकांशी देखील संवाद साधणार आहेत.
राहुल गांधी आज महाबळेश्वर येथील पॉइंट, प्रेक्षणीय वेण्णा लेक याची पाहणी करणार आहेत. दरम्यान, ते महाबळेश्वरला एका कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी उपस्थित राहणार असून त्यांचा हा दौरा खासगी आहे. राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने महाबळेश्वरमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढत चालले असून, वेण्णालेक परिसर, लिंगमळा परिसरामध्ये थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहे. महाबळेश्वर पर्यटनस्थळी काही दिवसांपासून तापमानात मोठी घसरण झाली असून थंडीचा कडाका वाढला आहे. अशात एका लग्नासाठी राहुल गांधी महाबळेश्वर येथे आज येणार आहेत.