सातारा जिल्ह्यातील ‘या’ पालिकेने केला धोकादायक इमारतींचा सर्वे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पावसाळा जवळ आला की शहरी भागातील पालिका प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने उपाययोजना आखण्यास सुरुवात केली जाते. याचा एक भाग म्हणजे कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगरपालिकेच्या वतीने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेमध्ये तब्बल २३ इमारती धोकादायक आढळल्याचे दिसून आले आहे.

रहिमतपूर नार्गपैकेच्या हद्दीत असलेल्या व मोडकळीस पडलेल्या इमारती, घरे पावसाळ्यात कोसळण्याची शक्यता असते. तसेच रस्त्याकडेला असलेल्या इमारती देखील रस्त्यावर कोसळल्यास त्यामुळे जीवित हानी होण्याची भीती असते. संभावित दुर्घटना व नुकसान टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने शहरातील इमारतीचा सर्व्हे केला आहे.

गतवर्षीही इमारती धोकादायक ठरवून संबंधित मिळतदारांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. धोकादायक घरात वास्तव्य करणाऱ्या मिळकतदारांना नोटिसा बजाऊन पर्यायी ठिकाणी स्थलांतर करण्याची सूचना केली होती. परंतु अनेकांनी धोका पत्करून त्याच घरात वास्तव्य केल्याचे दिसून आले होते. यंदाच्या वर्षी २३ मिळकती धोकादायक असल्याचे सर्वेक्षणात निष्पन्न झाले आहे.