सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे तब्बल 29 गुन्हे करून फरार असलेल्या आरोपीस पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी अभय झाकीर काळे (रा. मोळ, ता. खटाव जि.सातारा) असे पुसेगाव पोलीसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वर्धनगड,ता. खटाव येथील गंभीर गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी अभय झाकीर काळे (रा. मोळ, ता. खटाव जि.सातारा) हा अनेक दिवसांपासून फरार होता. तो वर्धनगड परीसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पुसेगाव पोलिसांनी एक तपास पथक तयार केले. तसेच वर्धनगड येथे जाऊन पोलिसांच्या पथकाने आरोपीचा शोध घेत असताना पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या अभय काळे याला पाठलाग करून ताब्यात घेतले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. आशिष कांबळे, पोलीस हवालदार योगेश बागल, पोलीस नाईक सुनिल अबदागिरे, प्रमोद कदम, अशोक सरक, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश घाडगे, अमोल जगदाळे, महीला पोलीस कविता बरकडे, होमगार्ड सुरेंद्र काटकर यांनी सदरची कारवाई केली आहे.