सातारा प्रतिनिधी । पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी तसेच सातारा जिल्ह्यातील एकूण १४ गुन्ह्यामध्ये व १० पेक्षा अधिक एनवीडब्ल्यू व स्टँडींग वॉरंटमध्ये असलेला आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून फरारी होता. या फरार आरोपीस अटक करण्यात पुसेगांव पोलिसांना यश आले आहे.
झाकीर रिकव्हल्या काळे (मूळ रा. मोळ, ता. खटाव, सध्या रा. भांडेवाडी ता. खटाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, उपाविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव श्रीमती सोनाली कदम यांनी पोलीस ठाणेस दाखल असलेल्या आणि वेळोवेळी मालमत्तेचे गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर दि. ०५.१०.२०२४ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली.
खातगुण ता. खटाव येथे आरोपी झाकीर रिकव्हल्या काळे (मूळ रा. मोळ, ता. खटाव जि. सातारा, सध्या रा. भांडेवाडी ता. खटाव) हा खातगुण गावचे परीसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. सदरची गोपनीय माहिती मिळाल्याने पुसेगाव पोलीस ठाणेकडील एक तपास पथक तयार केले. खातगुण येथे आरोपीचा शोध घेतला असता गावातील बंधाऱ्याच्या भिंतीचे आडोशाला आरोपी दबा धरून बसलेला दिसून आला. पोलीसांनी त्यास सर्व बाजूंनी घेराव टाकला असता आरोपी झाकीर काळे हा पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्यास पोलीस पथकाने पाठलाग करुन शिताफीने पकडून ताब्यात घेतले.
सातारा जिल्ह्यातील पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत १२ गुन्हे, फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत १ गुन्हा, वडूज पोलीस ठाणे हद्दीत १ गुन्हा अशा एकूण १४ गुन्हयातून तसेच न्यायालयाने काढलेल्या १० पेक्षा अधिक एन.बी.डब्ल्यू व स्टँडिंग वॉरंट, पकड वॉरंटमध्येही बऱ्याच कालावधीपासून फरार असलेला आरोपी झाकीर काळे यास पुसेगाव पोलीसांनी शिताफीने पकडून कारवाई केली आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधीक्षक श्रीमती सोनाली कदम यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदीप पोमण, पोलीस हवालदार दौलत कुदळे, योगेश बागल, पोलीस नाईक सुनिल अबदागिरे, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर जाधव, अविनाश घाडगे, उमेश देशमुख, होमगार्ड निलेश पवार, कृष्णा यादव होमगार्ड यांनी सदरची कारवाई केली आहे. कारवाई पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांनी अभिनंदन केले आहे.