पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी, शेळी विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घ्यावा : डॉ. दिनकर बोर्डे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ अंतर्गत राजे यशवंतराव होळकर योजना, मेंढ्यांसाठी चराई अनुदान, मेंढी शेळी पालनासाठी १ गुंठा जागा खरेदी अनुदान व १०० परसातील कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान या योजनांच्या लाभासाठी जिल्ह्यामधून भज (क) प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज 26 सप्टेंबर पर्यंत करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपाआयुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांनी केले आहे.

या योजनेमधील अर्जदारांची प्रतीक्षाधिन यादी पुढील ५ वर्ष ग्राह्य धरली जाईल. सांकेतिक स्थळ आणि मोबाईल अॅप्लिकेशन द्वारे भज (क) प्रवर्गातील योजनांचा लाभ घेता येईल. महामेष मोबाईल अॅप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवर डाऊनलोड करण्यास उपलब्ध आहे.

या योजनेबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी https://www.mahamesh.org/ या संकेतस्थळाचा वापर करावा. आवश्यक कागदपत्रांची यादी संकेतस्थळावर योजनानिहाय उपलब्ध आहे. अनुदानाची मर्यादा उपघटक निहाय ५०% ते ७५% च्या मर्यादेत देय राहील.