पुणे-सातारा रेल्वेमार्ग आज आणि उद्या बंद; गाड्यांचे मार्ग बदलले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । पुणे-सातारा रेल्वेमार्ग आज आणि उद्या बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे विभागाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे हा मार्ग बंद ठेवत काही रेल्वेचे मार्ग देखील बदलण्यात आले आहेत. मुंबई-कोल्हापूर दरम्यान धावणारी कोयना एक्स्प्रेस रविवारी रद्द करण्यात आली असून पुणे – कोल्हापूर धावणारी पॅसेंजर रविवारी पुणे – सातारा मार्गे धावणार नसल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.

कोल्हापूर पुणे लोह मार्गावरील मिरज पुणे दरम्यान रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण व काही ठिकाणी नव्याने अंडरपासची कामे सुरू आहेत. रविवारी नीरा लोणंद दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक नव्या रेल्वे रुळांना जुन्या रुळांशी जोडण्याची काम व इतर कामे होणार आहेत. यामुळे काही काळासाठी संपूर्ण रेल्वे वाहतूक बंद ठेवावी लागत असते. रविवार दि. २० ऑगस्ट रोजी गाडी नंबर ११.३० कोल्हापूर हुन मुंबईकडे जाणारी व ११.२९ मुंबई हुन कोल्हापूरकडे जाणारी कोयना एक्स्प्रेस धावणार नाही तसेच ११४२५ पुणे ते कोल्हापूर व ११४२६ कोल्हापूर ते पुणे पॅसेंजर गाडी पुणे ते सातारा दरम्यान बंद राहणार आहे.

कोयना एक्स्प्रेस व पॅसेंजर गाडीच्या दोन्ही दिशांच्या फेऱ्या रद्द होणार असल्याने प्रवाशांनी दुसऱ्या मार्गाचा अवलंब करावा, असे आव्हान रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, पुणे विभागातील पुणे-सातारा रेल्वे मार्गावरील नीरा-लोणंद स्टेशनदरम्यान ट्रॅफिक ब्लॉक घेऊन वर्तमान डाऊन मेन रेल्वे मार्गाला नवीन तयार होत असलेल्या रेल्वे मार्गासोबत जोडण्याचे आणि इतर महत्त्वपूर्ण कामे केली जाणार आहेत.