हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन (Pune Metro) : पुणे मेट्रोचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी प्रारंभ झाला होता. लोकोपायलट अपूर्वा प्रमोद अलाटकर हिने मेट्रोची ‘मास्क ऑन की’ च्या साथीने सर्व तांत्रिक बाबींच्या मदतीने वनाझ येथून उद्घाटनाची फेरी पूर्ण केली. यानंतर सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते मेट्रो चालवणार्या अपूर्वा लाटकर या तरुणीने. पुण्यातील मेट्रोचं स्टेअरींग हातात घेणारी अपुर्वा मुळची सातार्याची असून तिचं शिक्षण काय झालंय? ती कोण आहे याबाबत आपण आज माहिती घेणार आहोत.
सातारा शहरातील शाहूपुरीतील रांगोळे कॉलनीत अपूर्वा अलाटकर रहाते. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण तिने सज्जनगड येथील ज्ञानश्री इन्स्टिट्यूटमध्ये त्याच शाखेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला २०१९ मध्ये पुणे मेट्रोसाठीच्या विविध पदांसाठीची माहिती तिला मिळाली. अर्ज केल्यानंतर अपूर्वाला पहिल्या फेरीसाठी मेट्रोकडून बोलावण्यात आले. पहिली, दुसरी व तिसऱ्या फेरीतील सर्व निकष, कठीण पातळ्या पूर्ण करत फेब्रुवारी २०२३ मध्ये अपूर्वाने मेट्रोतील सेवेत आपले स्थान पक्के केले. निवडीनंतर तिच्याकडे वनाझ स्थानकाच्या स्टेशन कंट्रोलर आणि ट्रेन ऑपरेटर अशी दुहेरी जबाबदारी सोपवण्यात आली.
मेट्रोच्यावतीने पुण्यात चार मार्गांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर त्या मार्गांच्या लोकार्पणाची तयारी प्रशासनाकडूवन सुरू होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे ठरल्यानंतर चारही मार्गांवर धावणाच्या मेट्रो चालवण्यासाठीचे आवश्यक प्रशिक्षण सुरू केले. या प्रशिक्षणार्थीमध्ये अपूर्वाचा देखील समावेश होता. हे ४५ दिवसांचे खडतर तांत्रिक प्रशिक्षण तिने पूर्ण केले.
नियोजनानुसार अपूर्वा वनाझ येथील मेट्रोत मास्क ऑन की सह सज्ज होती. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवल्यानंतर अपूर्वाने ‘मास्क ऑन की’चा वापर करत मेट्रो रूबी क्लिनिककडे मार्गस्थ केली. अपूर्वा च्या कामगिरीबद्दल सर्व सातारकरांना सार्थ अभिमान आहे तिला पुढील वाटचालीस लक्ष लक्ष शुभेच्छा.