पुणे विभागाच्या सल्लागार समिती बैठक: वंदे भारत एक्सप्रेससह महत्वाच्या गाड्यांना कराड स्थानकावर थांबा द्या!

0
908
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पुणे विभागाच्या सल्लागार समितीची पुण्यात नुकतीच महत्वाची बैठक पार पडली. यावेळी कोल्हापूर-अहमदाबाद एक्सप्रेस व जोधपुर एक्सप्रेस व सर्व समर स्पेशल ट्रेन, हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस या सर्व गाड्यांना कराड स्थानकावर थांबा देण्यात यावी अशी महत्वाची मागणी सल्लागार समिती सदस्य श्री. गोपाल तिवारी यांनी केली.

पुणे विभागाच्या सल्लागार समितीची बैठक विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. राजेश कुमार वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने पार पडली. या बैठकीस पुणे विभागाच्या सल्लागार समितीचे सदस्य गोपाल तिवारी, शिवनाथ बियाणी, एँड. विनीत विलास पाटील, राहुल रमण, ऋतुराज अर्जुनराव काळे, राम बी जोगदंड, राजकुमार नाहर, रणजीत श्रीगोंदा, गोरख हरिभाऊ पहाटे अदि सल्लागार समिती सदस्य उपस्थित होते.

यावेळी विभागीय रेल प्रबंधक श्री. राजेश कुमार वर्मा यांनी या बैठकीस मार्गदर्शन करताना पुणे विभागातील प्रवाशांच्या सुविधा, विकास कामे, सुरक्षा, वेळेवर गाड्या धावणे, सिग्नल प्रणाली मजबूर करण्यासाठी कार्यरत असल्याचे सांगितले.
बैठकीला उपस्थित असलेल्या सदस्यांनी वेगवेगळ्या विषयावर आपल्या मागण्या मांडल्या. यावेळी कराड मधून सल्लागार समिती सदस्य श्री गोपाल तिवारी यांनी गाडी क्रमांक 11050/11049 कोल्हापूर अहमदाबाद एक्सप्रेस, गाडी क्रमांक 16534/16533 जोधपुर एक्सप्रेस व सर्व समर स्पेशल ट्रेन आणि गाडी क्र.20669 / 22670 हुबळी पुणे वंदे भारत एक्सप्रेस या सर्व गाड्यांना कराड स्थानकावर थांबा देण्याची मागणी केली.

तसेच गाडी क्र. 20654/20653 बेंगलोर बेळगाव एक्सप्रेस व गाडी क्र.16589/16590 राणी चन्नम्मा एक्सप्रेस या गाडीचा सातारा पर्यंत विस्तार करण्यात यावा. पुणे सातारा व सातारा मिरज अशी पुलपुश लोकल व मिरज मधून सुरत व वडोदरासाठी वंदे भारत एक्सप्रेस तसेच सातारा ते बेळगावी डेमो लोकल सुरू करण्यात यावी कोल्हापूर ते प्रयागराज एक स्पेशल ट्रेन कुंभमेळ्यासाठी सोडण्यात यावी व कराड रेल्वे स्थानकावर यु टी एस आणि पीआरएस सिस्टम व्यवस्था सुरू करण्यात यावी अशी मागणी तिवारी यांनी यावेळी केली.