येवतेश्वर घाटातील सांबरवाडी हद्दीतील ‘ते’ धोकादायक दगड हटवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | येवतेश्वर घाटातील सांबरवाडी हद्दीतील घाटात दगडांमुळे धोका निर्माण झाला होता. त्यामुळे हा घाटातील मार्ग काहीकाळ बंद ठेवण्यात आला. तसेच आज सकाळी येवतेश्वर घाटातील सांबरवाडी हद्दीतील धोकादायक दगड काढण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

यावेळी जेसीबीच्या साह्याने दगड काढण्याचे काम करताना निखळलेले दगड रस्त्यावर येऊन आदळले. त्यामुळे घाटातील रस्त्याचा पृष्ठभाग तसेच संरक्षक कठडे तुटले. यावेळी त्या ठिकाणी तात्पुरती संरक्षणात्मक उपाययोजना म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले. व ज्या ठिकाणी संरक्षक भिंती तुटले आहेत अशा ठिकाणी बॅरिकेड लावण्यात आले.

रात्रीच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणचा रस्ता वाहतुकीसाठी अद्यापही बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे या मार्गावरुन कोणीही रात्रीच्यावेळी प्रवास करू नये असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.