सातारा प्रतिनिधी | चौदाव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उद्या गुरुवारी दि. २५ रोजी सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रीय मतदार दिन म्हणून लाेकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यात येणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम साजरा करण्याबाबत सर्वसमावेशक प्रचार- प्रसाराचा आराखडा, जिल्हास्तरीय आयकॉन व्यक्तींचा समावेश, विविध संस्थांची भागीदारी व सहयोग, समाज माध्यमांमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत.
शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयातील मतदारांचा सहभाग घेवून लाेकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ गुरुवारी घेतली जाणार आहे. या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करुन मतदार जनजागृती करावी, असे आवाहन निलेश घुले यांनी केले आहे.