कलापथकाच्या माध्यमातून समाज कल्याण योजनांची होणार जनजागृती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांसाठी असणाऱ्या योजनांची माहिती त्यांच्याच सोप्या भाषेत लोककला पथकाच्या माध्यमातून आजपासून ते दि. 15 फेब्रुवारी कालावधीत जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी संवाद साधताना दिली.

याबाबत जिल्हा माहिती अधिकारी पाटोळे म्हणाल्या की, या कलापथकांचे कार्यक्रम एकूण अकरा तालुक्यात होणार आहेत. त्यामध्ये सातारा तालुक्यातील निगडी तर्फ सातारा, सैदापूर. कराड तालुक्यातील शेरे व कार्वे, पाटण तालुक्यातील म्हावशी व विहे, कोरेगाव तालुक्यातील तारगाव व बारेगाव, फलटण तालुक्यातील खामगाव, बरड, सस्तेवाडी व सुरवडी या ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत.

तसेच खटाव तालुक्यातील कातरखटाव व निढळ, माण तालुक्यातील कुकुडवाड व शिंगणापूर, वाई तालुक्यातील उडतारे व आसले, खंडाळा तालुक्यातील पिंपरे बु व जवळे, जावळी तालुक्यातील खर्शी तर्फ कुडाळा, इंदवली व सायगाव महाबळेश्वर तालुक्यातील दुधगाव अशा एकूण 24 गावांमध्ये देखील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात असल्याची माहिती पाटोळे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.