विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात जनजागृती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । केंद्र शासन पुरस्कृत योजना तळागळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे २४ नोव्हेंबरपासून आयोजन करण्यात आले आहे. ही संकल्प यात्रा २६ जानेवारी २०२४ पर्यंत सूरू राहणार असून यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासह अर्ज भरून घेण्यात येत आहेत. या यात्रेस आज कराड तालुक्यातील कोणेगाव येथून प्रारंभ करण्यात आला.

विकसित भारत संकल्प यात्रा उद्या दि. 13 डिसेंबर रोजी माळवाडी येथे 10 ते 2 , पिंपरी येथे 3 ते 5 तर दि. 14 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत यशवंतनगर व शहापूर येथे 3 ते 5 या वेळेत विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचे चित्ररथ दि. १३ डिसेंबरला दापकेघर, शेडगेवाडी, १४ डिसेंबर रोजी भादे आणि वाठार बु. येथे जाणार आहेत.

वाई तालुक्यात १२ डिसेंबर रोजी भिवडी पु. व चांदवडी पु., दि. १३ डिसेंबर – राऊतवाडी, खोलवडी, अमतवाडी तर १४ डिसेंबरला काळंगवाडी आणि गोवेदिगर येथे संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १३ डिसेंबर कोळकी, ठाकुरकी तर १४ डिसेंबर रोजी झिरपवाडी आणि दुधेबावी येथे यात्रेचे चित्ररथ जाणार आहेत.

महाबळेश्वर तालुक्यात दि. 13 डिसेंबर रोजी देवसरे व कुरोशी, १४ डिसेंबर रोजी सोनाट. पाटण तालुक्यात दि. 13 डिसेंबर रोजी चोपदारवाडी सकाळी 10 वाजता, मरळी दुपारी 3 वाजता, 14 डिसेंबर रोजी पापडे सकाळी 10. सातारा तालुक्यात दि. 13 डिसेंबर रोजी काशिळ व पाडळी, 14 डिसेंबर रोजी मांडवे व निनाम. जावळी तालुक्यात दि.13 डिसेंबर रोजी आपटी सकाळी 10 वाजता, कारगाव येथे दुपारी 3 वाजता, 14 डिसेंबर 2023 रोजी केंजळ येथे सकाळी 10 वाजता, मोरावळे येथे दुपारी 3 वाजता. खटाव तालुक्यात दि. 13 डिसेंबर रोजी जायगाव येथे सकाळी वाजता अंभेरी येथे दुपारी 3, 14 डिसेंबर रोजी भोसरे येथे सकाळी 10 वाजता लोणी येथे 3 वाजता जाणार आहे.

केंद्र शासनाच्या योजनांचा अद्याप लाभ मिळाला नाही अशा जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्याला लाभ मिळवून देणे या उद्देशाने ही यात्रा सुरू आहे. पीएम-स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आयुष्यमान योजना कार्ड, आरोग्य तापसणी, आधार अपडेट, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना आदी विविध योजनांचा लाभ देण्यासोबत शासकीय योजनांची माहितीदेखील देण्यात येत आहे. तरी नागरिकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.