माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी किसन वीर साखर कारखान्याकडून पाण्याचा टँकरची सोय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उदात्त हेतूने किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थापनाने वारकऱ्यांच्या सेवार्थ पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सोय केलेली आहे. या पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे पुजन किसन वीर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करून तो वारकऱ्यांच्या सेवेसाठी मार्गस्थ करण्यात आला.

कार्यक्रमास कारखान्याचे संचालक प्रकाश धुरगुडे, संजय कांबळे, विलासराव बाबर, कार्यालयीन अधिक्षक उमेश अंबिके, वित्त अधिकारी मधुकर जाधव, केन मॅनेजर शंकरराव कदम, मुख्य शेती अधिकारी विठ्ठलराव कदम, ईडीपी मॅनेजर आर. जे. सणस, परचेस ऑफिसर संतोष जगताप, राजेंद्र जगताप, नितीन निकम, तोडणी वाहतुक संस्थेचे मॅनेजर बी. आर. सांवत यांच्यासह शेतकरी सभासद उपस्थित होते.

यावेळी प्रमोद शिंदे म्हणाले, आळंदीहुन निघालेल्या या वारीमध्ये सर्व स्तरातून वारकरी सहभागी होत असतात. पंढरीच्या वारीमध्ये फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सिम भक्तीचे दर्शन होत असते. हरीमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा प्रवास पायी करून पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतात.

या वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवु नये, याकरिता किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील कारखाना व्यवस्थापनाने वारकऱ्यांच्या सेवेसाठी मागील दोन वर्षांपासून कारखान्यामार्फत पाण्याचा टँकर देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता.