पृथ्वीराज चव्हाणांविरोधात फडणवीसांकडून अपशब्द; दत्त चौकात काँग्रेसनं केलं आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड दक्षिण मतदार संघात मलकापूर येथे महायुतीच्या प्रचाराला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी जाहीर सभेत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली व अपशब्द वापरले असा आरोप करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा दत्तचौकात रात्री जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी, महिलांनी फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यांच्या हातामध्ये निषेधाचे फलक लावले होते घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माफी न मागितल्यास कराड शहरांमध्ये विराट मोर्चा काढून त्यांचा निषेध नोंदवण्यात येईल त्याचबरोबर त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेऊ देणार नसल्याचा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आला.