सातारा जिल्ह्यातील 4 मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय पक्षांकडून पक्ष बळकटीकरण करणे, सदस्यसंख्या वाढीसाठी बैठका घेऊन मोर्चेबांधणी केली जात आहे. सातारा जिल्ह्यात भाजप, काँग्रेस, शिवसेना, मनसेसह आता फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट व शरद पवार गटाकडून सुद्धा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी केली जात आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार सातारा जिल्ह्यातील नवीन मतदान केंद्र पुनर्गठित करण्याबाबतच्या प्रस्तावाचे काम जिल्हाधिकारी तथा निवडणूक विभागाकडून केले जात आहे. जिल्ह्यातील चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकताच सादरकरण्यात आला आहे.

सातारा येथे नुकतीच उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यखतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला निवडणूक अधिकारी, मंडलाधिकारी, तलाठी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, कर्मचारी तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये 262- सातारा विधानसभा मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्राच्या सुसुत्रिकरण्याचा आढावा संबंधित गावचे मंडलाधिकारी, तलाठी व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत घेण्यात आला.

यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार ज्या मतदार यादी भागात 1 हजार 500 किंवा अधिक मतदार असतील किंवा आगामी कालावधीत 1 हजार 500 मतदार पूर्ण होतील. त्याअनुषंगाने मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 232, 248, 241 व 307 या मतदार केंद्रावरील मतदारांची संख्या 1 हजार 450 च्या वर असल्याने हे चार मतदान केंद्र विभागण्यात येणार आहे. तसेच मतदार यादी भागासाठी नवीन मतदान केंद्र पुनर्गठित करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे काल सादर करण्यात आला आहे.