सातारा लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून मनाई आदेश जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया उद्या मंगळवार, दि. ४ रोजी पार पडणार आहे. त्या अनुषंगाने विविध पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी, नागरीक यांना जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या वतीने मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यांचे नागरिकांनी तंतोतंत पालन न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

या आदेशामध्ये सातारा जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम २०१४ चे कलम ३६ प्रमाणे कोणीही विजयी मिरवणुका, फटाके बाजवणे, गुलाल उधळणे, डी. जे. (डॉल्बी) वाजवण्यास निर्बंध घालण्यात येत आहे. २) ४५ सातारा लोकसभा मतमोजणी अनुषंगाने सातारा जिल्ह्यात मा. जिल्हाधिकारी सातारा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) अन्वये शस्त्रबंद व जमावबंदी आदेश जारी केलेले आहेत.

३) ४५ सातारा लोकसभा मतमोजणी केंद्रसभोवतालचे १०० मीटर परिसरात क्रिमिनल प्रोसिजर कोड १९७३ चे कलम १४४ प्रमाणे मतमोजणी प्रक्रिया विना अडथळा व भयमुक्त वातावरणात पार पडावी याकरीता आदेश पारीत करण्यात आलेले असून दि.०४/०६/२०२४ रोजीचे ००.०० वा. पासून ते मतमोजणी संपेपर्यत पुढील कृती करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येणे.

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तीने मोबाईल फोन, कॉर्डलेसफोन, लाऊड स्पीकर, मेगा फोन, वायरलेस सेट इत्यादी बाळगणेस, अथवा मतमोजणी गोपनियतेचा भंग होईल अशी कृती करणे, मतमोजणी परिसरात सर्व प्रकारच्या आस्थापना दुकाने चालू ठेवणे, मतमोजणी केंद्रातील निवडणूक प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी वा इतर प्रतिनिधी यांनी मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल वापरणे किंवा फोटो काढणे अथवा चित्रीकरण करणे कोणत्याही व्यक्ती कोणत्याही प्रकारची शस्त्रे बाळगण्यास मनाई करण्यात आलेली आहे. ४) ४५ सातारा लोकसभा मतमोजणी अनुषंगाने दि.०३/०६/२०२४ रोजीचे ११.५५ वा. पासून ते ०४/०६/२०२४ रात्रौ २०.०० वा.पर्यत सुटकेस चौक-डीएमओ गोडाऊन-भोर चौक हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे. मतमोजणी करीता येणारे राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचेसाठी चंदननगर तलाव खालील बाजूस व भोर चौक ते एमआयडीसीकडे जाणारे रोडच्या दोन्ही बाजूस पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे.

६) सातारा जिल्ह्यातील सर्व सोशल मिडीयाद्वारे फेसबुक, इन्स्ट्राग्राम, द्विटर, व्हॉट्सअॅप ग्रुप व इतर तत्सम अॅप्लीकेशनच्या माध्यमाद्वारे कोणत्याही व्यक्तीच्या, समाजाच्या जातीच्या, धर्माच्या, गटाच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या कॉमेंन्ट्स, स्टोरी, स्टेट्स, डिजीटल बॅनर, पोस्ट्स वरील माध्यमाद्वारे पसरवू नयेत. व्हॉट्सअॅप ग्रुपचे अॅडमीन यांनी त्यांच्या ग्रुपच्या सेटींगमध्ये असा बदल करून घ्यावा.

जेणेकरून ग्रुप मधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर टाकणार नाहीत. जर अॅडमीन यांनी सेंटींगमध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट टाकणारा व ग्रुप अॅडमीन याला जबाबदार धरून त्यांचेवर योग्य ती कायदेशिर कारवाई करण्यात येईल. ७) महाराष्ट्र शासन, राज्यउत्पादन शुल्क विभाग सातारा यांचेकडील आदेशान्वये सातारा जिल्ह्यात मतमोजणीचे दिवशी दारूची दुकाने बंद ठेवणेबाबत आदेश पारीत करण्यात आलेले आहेत.